Students Feedbacks  
 
नमस्कार सर,
मी आपला कधी विद्यार्थी नव्हतो पण आपला विद्यार्थ्याप्रती असणारा जिव्हाळा आणि आपल्या विलक्षण कर्तुत्वाचा चाहता आहे. प्रथम आपण जो भारती विद्यापीठ, कोल्हापूरचा अगदी काही दिवसात आपल्या असामान्य कर्तुत्वाने कायापालट केलात त्याबद्दल मीच काय माझासारखे असंख्य भारती विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्याजवळ आभार व्यक्त करतो. प्रत्येक विद्यार्थ्याला मनाशी वाटत असत कि, आपण ज्या कॉलेजमध्ये शिकत असतो ते प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्ट असाव. मला वाटत, नेहमी चांगल्या गोष्टीबद्दल बोललेलं...चांगले गुण घेतलेले चांगल असत त्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये आधी काहीच नव्हते म्हणण्यापेक्षा आता सर्व काही आहे हे म्हणणे समाधानकारक वाटते.
 
मी भारती विद्यापीठ, कोल्हापूरमध्ये विद्यार्थी म्हणून ६ वर्ष होतो. तुम्ही येथे डायरेक्टर पदावर 'नियुक्त' व्हायच्या आधीच येथून आमची 'बदली' झाली. पण गेल्या काही दिवसात कॉलेजला भेट दिल्यानंतर खुप चांगले वाटले..समाधान वाटले. सर ! मला पोकळ स्तुती करायची सवय नाहीये जे बोलतो ते खर..मग ते कितीही वाईट का असेना. पण एकवेळ आम्ही सर्वजण कॉलेजला 'नावे' ठेवत असू कि इथे जी कॉलेजची 'वैशिष्ठे' लिहिली आहेत त्याच्या अगदी उलट आहे ; पण तुम्ही येथे आल्यानंतर इथले वातावरण आणि झालेला बदल पाहून आम्ही 'नावे' ठेवत असलेल 'नाव' तुम्ही आपल्या कर्तुत्वाने रोशन केलं आहे. आपण फक्त आडनावानेच नाहीतर 'कर्तुत्वाने' सुद्धा भारती विद्यापीठाचे 'नायक' आहात. :-)
सर ! मी येत्या ४-२ दिवसात येईन कॉलेजमध्ये येईन तेव्हा मला आपल्याशी १०-५ मिनिट चर्चा करायची आहे. आशा आहे आपण निश्चितच वेळ द्याल.बाकी ! आपल्या भावी वाटचालीस मनापासून अगणित शुभेच्छा ! आपण हाक द्याल तेव्हा आम्ही आपल्यासाठी हजर असू सर .धन्यवाद !
 
- विजय आसबे